मुंबईत गोवरचे ७४० संशयित रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2022

मुंबईत गोवरचे ७४० संशयित रुग्ण


मुंबई - मुंबईमध्ये सप्टेंबरपासून गोवर (Measles Rubella in Mumbai) आजाराची साथ आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १०९ रुग्ण तर ७४० संशयित रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत आहेत. दोन महिन्यात येथे ८४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ३ सदस्सीय टीमने आज भेट देवून आढावा घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

मुंबईमध्ये एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून दोन महिन्यात ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. एम पूर्व गोवंडी विभागात एकूण ९२ हजार ९७६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १२३० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत ९ लाख २६ हजार ४९२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यात १०९ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४० संशयित गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५६६८ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व "अ" देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad