मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आपल्या प्रलंबित मागण्यासांठी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्यूनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाला जाब विचारण्याकरीता दादर येथील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निदर्शने करणार आहेत.
नादुरुस्त हजेरी चौक्या, कालबध्द पदोन्नती, कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक भत्ते, कामगारांच्या वस्तू कामासाठी लागणारे साधन सामग्री, सेवानिवृत्त मृत कामगारांचे रखडलेले दावे व नोकरी प्रकरण या प्रलंबित प्रश्नावर पालिका प्रशासनातील अधिकारी कोणतिही कार्यवाही करताना दिसत नाहीत. यामुळे कामगारामध्ये प्रचंड नाराजी व चीड निर्माण होऊन ते म्यूनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाला जाब विचारण्याकरीता निषेध मोर्चा काढून निदर्शने करणार आहेत.
महापालिकेच्या जी उत्तर, दादर विभागत कार्यालय येथे मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता हा मोर्चा काढला जाणार असून त्यात विविध खात्यातील चतुर्थश्रेणी कामगार सहभागी होणार आहेत. सदर प्रसंगी यूनियनचे पदाधिकारी अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर हे उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित राहणार आहेत असे यूनियनचे चिटणीस अब्दुल पटेल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment