जे जे रुग्णालयात भुयार सापडलं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2022

जे जे रुग्णालयात भुयार सापडलं


मुंबई - मुंबईतील जे.जे. रुग्णालय (J J Hospital) परिसरात नर्सिंग क़ॉलेजचा भाग डी.एम. पेटीट नावाच्या 130 वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक भुयार (Tunnel) सापडलं आहे. सापडलेल्या या भुयारामुळं आता अनेकांचीच उत्सुकता आणि कुतूहल शिगेला पोहोचलं आहे. काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज परिसरात, राज्यपाल राहत असलेल्या राजभवन येथेही असंच भुयार सापडलं होतं.

बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आलाय ज्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारं झाकण काढण्याचा प्रयत्न केला. झाकण निघताच तिथं काहीशी पोकळी असल्याचं त्यांना जाणवलं. सुरक्षा रक्षकांच्या सहाय्यानं पुढील पाहणी केली आणि तिथं भुयार असल्याचे समोर आले आहे. हे भुयार साधार 200 मीटरचं असून, इमारतीचं आयुर्मान पाहता ते 130 वर्षे जुनं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयारबाबत कळवण्यात आलं आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सर जे जे रुग्णालयाची वास्तू आणि सदरील भागामध्ये बऱ्याच ब्रिटीशकालीन (British) इमारती आहेत. त्यातच आता सापडलेलं भुयार पाहता आता मुंबई जिल्हाधिराऱ्यांकडे (Mumbai Collector) यासंदर्भातील माहिती सोपवण्यात आली आहे.

177 वर्षांपूर्वी रुग्णालयाचे बांधकाम -
सर जे जे रुग्णालयाच्या इमारती 177 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. सर जमशेदजी जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती उभारण्यात आल्या आहेत. 16 मार्च 1838 रोजी जमशेदजी जिजीभॉय यांनी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर 30 मार्च 1843 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. तर 15 मे 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad