मुंबई - मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त पदाचा दर्जा असलेल्या अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या नव्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा पालिकेत अधिकारी वर्गाची खांदेपालट करण्यात आले आहे. आदेशानंतर पश्चिम उपनगरातील तीन अधिकारी वर्गाच्या बदल्या करण्यात आली आहे. या अधिका-यांच्या एच ईस्ट, आर -साऊथ आणि आर - मध्य या विभागात बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त पदावर असणाऱ्या अलका ससाणे यांची एच- पूर्व विभागातून आर दक्षिण विभागात बदली करण्यात आली आहे. तर संध्या नांदेडकर यांची बदली आर- दक्षिण विभागातून आर - मध्य विभागात करण्यात आली आहे. तर स्वप्नजा क्षीरसागर यांना एच पूर्व विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अल्पावधीतच पुन्हा एकदा स्वप्नजा क्षीरसागर यांची बदली करण्यात आली आहे. याआधी एफ- दक्षिण विभागात कार्यरत असलेल्या स्वप्नजा क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती.
No comments:
Post a Comment