ओडिशा / कटक - ओडिशातील केओंझार जिल्ह्यात शिलीपदा- पाटणा वन परिक्षेत्राच्या जंगलात २४ हत्तींनी बुधवारी मोहफुलाच्या दारूची पार्टी (elephants alcohol party) केली. त्यामुळे सुस्तावलेल्या हत्तींनी जीथे जागा मिळेल तिथे यथेच्छ झोप काढली. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी अखेर ढोल ताशे लावत हत्तींना जागे केले आणि जंगलात हुसकावून लावले.
मोहाच्या झाडाची ही फुले एक अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी आंबविली जातात. ज्याला महुआ म्हणतात. जंगलाजवळच्या आदिवासींनी ही मोहफुले दारू गाळण्यासाठी एका कुंड्यात भिजवून ठेवली होती. सकाळी ६ वाजता गावकरी महुआ बनवण्यासाठी जंगलात पोहोचले. तेव्हा त्यांना तिथे २४ हत्ती यथेच्छ जिथे जागा मिळेल तिथे झोपलेले दिसले. ग्रामस्थांनी सर्व भांडी हत्तींनी दारूच्या नशेत तुडविली होती. ग्रामस्थांनी हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही उठले नाहीत. यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन रेंजर घासीराम पात्रा यांनी हत्तींना जागे करण्यासाठी ढोल वाजवत त्यांना जंगलात पिटाळून लावले.
No comments:
Post a Comment