मुंबई - राज्यातील साडे १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समोर आली आहे. तर ३९ लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधार कार्ड नोंदणी गरजेची आहे.
दरवर्षी राज्यातील शिक्षकांकडून सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. मागील तीन महिन्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम करत आहेत. सरल प्रणालीमध्ये माहिती भरत असताना यामध्ये विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सुद्धा गरजेची आहे. मात्र शिक्षण विभागाकडून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तब्बल साडे १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने सरल प्रणालीमध्ये त्यांची नोंद करण्याचे काम अडले आहे. सरल प्रणालीमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीनुसार शिक्षकांचे सुद्धा समायोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून केले आहे. सरल प्रणालीमध्ये ३९ लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होईना तर ३९ लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होत नाही. याची मुख्य तीन कारणे समोर आली आहेत.
३० नोव्हेंबरची मुदत वाढवण्याची शिक्षकांची मागणी -
आता या विद्यार्थ्यांच्या सरळ प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी कशा करायची, असा प्रश्न आता शिक्षकांसमोर उभा आहे. सरल प्रणातील विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. परंतु ३० नोव्हेंबरची मुदत वाढवण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. शिवाय यावर संबंधित शिक्षणाधिका-यांनी त्या त्या भागात विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करुन पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
No comments:
Post a Comment