खेरवाडी पोलिस ठाण्यात सिलिंडर स्फोट, पोलिस अधिकारी गंभीर जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2022

खेरवाडी पोलिस ठाण्यात सिलिंडर स्फोट, पोलिस अधिकारी गंभीर जखमी


मुंबई - मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यातील स्टोअर रुममध्ये सोमवारी दुपारी सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक पोलिस अधिकारी जखमी झाले. त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते ९५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन कक्षातून देण्यात आली.

मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्यात दुपारी साडेबाराच्या सुमारास स्टोअररुमध्ये अचानक सिलिंडर स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. सिलेंडर स्फोटामुळे झालेल्या भडक्याने लागलेल्या आगीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद जनार्दन खोत (५६) हे ९५ टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते गंभीररित्या भाजल्याने त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad