Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत महापालिका सुरक्षा रक्षकांस सुवर्ण पदक


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अमित सुरेश साटम यांनी दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी लोणावळा येथे ‘महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन’द्वारे आयोजित ‘शरदचंद्र श्री २०२२’ या राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल कामगिरी करत ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. परळ स्थित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमित साटम यांच्या या गौरवामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अमित साटम हे सन २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक (बक्कल क्रमांक ३५४६) म्हणून कार्यरत आहेत. आपली सुरक्षा दलातील नोकरी सांभाळून ते दररोज ३ तास व्यायाम करण्यासह ५ किलोमीटर धावण्याचा देखील नियमित सराव करीत असतात. साटम हे गेली ५ वर्षे विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असून एप्रिल २०२२ मध्ये पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या १० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश होता. तर अनेक जिल्हास्तरिय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत त्यांनी विविध पुरस्कार पटकाविले आहेत. 

शालेय व महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहका-यांना दिले आहे. या गौरवाबद्दल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी व सुरक्षा दल खात्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी अमित साटम यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom