सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2022

सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी


नागपू - कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय... शिंदे सरकार हाय हाय... गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप... खोके सरकार, खोटे सरकार... ५० खोके एकदम ओके... खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय... शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय...महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक...मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad