Mahaparinirvan Day - मुंबई महापालिका सेवा सुविधांसह सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2022

Mahaparinirvan Day - मुंबई महापालिका सेवा सुविधांसह सज्जमुंबई - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणा-या अनुयायांसाठी मुंबई महापालिका विविध सुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाली आहे. चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा आदी सोयी-सुविधा असतील. चैत्यभूमीवरील अभिवादन मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देशाच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोयी - सुविधेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असते. येथे येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय म्‍हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्‍या ६ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत. महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्‍यभूमी येथे करण्‍यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी होणार आहे. महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

काय असणार सुविधा -
- चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था.
- चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
- १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.
- छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
- रांगेत असणा-या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
- पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
- पिण्‍याचे पाणी असणा-या टँकर्संचीही व्यवस्था.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.
- अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
- चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
- विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्‍स्ची रचना.
- दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.
- मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.
- भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था.
- तात्‍पुरत्‍या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये.
- स्‍नानगृहे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad