यावेळी आमदार झिशान बाबा सिद्धीकी, माजी आमदार तृप्ती सावंत, परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, पंकज देवरे, तेजू सिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी चौधरी यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचा गौरव -
जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते माजी सैनिक अनिल पाटील यांचा मुलगा धनंजय याने 10 वी मध्ये 95.60 टक्के गुण प्राप्त केल्याने त्याचा प्रशस्तीपत्र आणि 10 हजार रूपयांचा धनादेश देवून सन्मान करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सिद्धेश देसाई आणि सिद्धार्थ देसाई (गोकुळदास हायस्कूल गोरेगाव), सोहम राणे (चिल्ड्रेन अकॅडमी, आशानगर) यांचाही गौरव करण्यात आला. निवडणूकविषयक उत्कृष्ठ काम केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांचाही सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment