कंत्राटी कामगारांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन - अशोक जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2023

कंत्राटी कामगारांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन - अशोक जाधव


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यात काम करणा-या १५ ते २० हजार कंत्राटी कामगारांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्या या मागणीसाठी मंगळवारी शेकडो कंत्राटी कामगारांनी आझाद मैदानात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. अनेक वर्षापासून काम करूनही कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते आहे. सध्या रिक्त असलेल्या ५१ हजार जागांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा युनियनने दिला आहे. (Integrate contract workers into municipal services)

गेल्या १५ ते २० हजार कंत्राटी कामगार २००७ पासून कमी वेतनात काम करीत आहेत. १९९५ साली पालिका प्रशासनाने १० हजार कंत्राटी सफाई कामगारांना पालिका सेवेत कायम केले होते. त्याच धर्तीवर सध्या ५१ हजार रिक्त असलेल्या जागांवर या कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे अशी मागणी म्युनिसिपल मजदुर युनियन सातत्याने करीत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कामगारांना तुटपुंज्या वेतनात काम करावे लागते आहे. वाढत्या महागाईत कामगारांना कुंटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे ही मागणी कामगारांची आहे. कामगारांच्या मागणीबाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शेकडो कामगारांनी आझाद मैदानात मोर्चा काढला. युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad