मुंबई - समाजातील गरजू वंचित उपेक्षित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने मागील आठ वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत असलेले एक वही एक पेन अभियान स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मशताल सिंदखेडराजा या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जिजाऊंवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमी जनतेने या दिवशी यथाशक्ती शैक्षणिक साहित्यांनी जिजाऊंना मानवंदना द्यावी असे आवाहन एक वही एक अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजातील गरजू वंचित उपेक्षित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यांची मदत व्हावी यासाठी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिवराज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज , महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासह सर्वच महापुरुषांचे जयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी कार्यक्रमात वह्या पेन पुस्तके, मोबाईल टॅब आदी अर्पण करून उत्सव साजरे करावेत असे आवाहन महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या वतीने एक वही एक पेन अभियानच्या माध्यमातून करण्यात येते तसेच त्यांचे कार्यक्रमदेखील ठिकठिकाणी राबविण्यात येतात या उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येते. मागील आठ वर्षांपासून सुरु असलेले हे अभिअयान आता राज्यातील विविध संस्था संघटनादेखील करीत असून त्याचा लाभ गरजूपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात.
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचा १२ जानेवारी रोजी येणार जयंतीउत्सव राज्यभरात मोठ्या उल्हासात साजरा केला जातो त्यांचे जन्मस्थळ असलेल्या विदर्भातील शिंदखेडा राजा या ठिकाणी हा उत्सव विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने व शिवप्रेमी जनतेच्या वतीने उत्सव मोठ्या हा प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी माँ जिजाऊ यांना मानवंदना देऊन अभिवादनासाठी येणाऱ्या शिवप्रेमी संस्था संघटना व जनतेने सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी आणि जिजाऊ सृष्टीवर येताना सोबत वह्या पेन पुस्तके वापरात नसलेले मोबाईल टॅब आदी शैक्षणिक वस्तूंनी माँ जिजाऊ याना मानवंदना द्यावी असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे. सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या राजे लाखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर या संस्थेच्या वतीने शैक्षणिक वस्तूं संकलन केंद्र उभारले असून या ठिकाणी आपले साहित्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठीव या अभियानात सहभागी होण्यासाठी ९३७२३४३१०८, ९८५०६३५१६६, ७५०७९६६२६०, ८३०८६५९३३६, ९९६००२७८८४ व ७०३०१२४५७३ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment