वरळीत लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2023

वरळीत लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यूमुंबई - विक्रोळीत लिफ्ट कोसळण्याची घटना ताजी असतानाच सोमवारी वरळीतील बी. जी. खेर मार्गावरील अविघ्न या बांधकाम सुरु असलेल्या १५ मजली इमारतीची लिफ्ट ट्रॉली कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

वरळीतील बी. जी. खेर मार्गावरील प्रेमनगर येथे अविघ्न ही १५ मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीवर कामगारांना ने - आण करणा-या लिफ्ट ट्रोलीवरून दोन कामगार इमारतीची काच पुसत असताना या लिफ्टसह हे कामगार खाली कोसळून गंभीर जखमी झाले. कामगारांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच या दोघांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे. दरम्यान लिफ्ट कोसळून कामगारांचा मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या पूर्वी ४ जानेवारी रोजी मुंबईतील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची पार्किंग लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad