Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही दुप्पट दंड !


नवी दिल्ली - हेल्मेट न घालणा-या दुचाकीचालकांना रोखण्यासाठी सर्व राज्यांमधील वाहतूक पोलिस कठोर झाले आहेत. वेगवेगळ््या राज्यांमध्ये कारवाईचे प्रमाण वाढले आहे. तसेच दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच सरकारकडून हेल्मेट आणि ते घालण्याच्या पद्धतीबाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. हा नियम मोडल्यास २,००० रुपयांचे चालान कापले जाऊ शकते. हा नियम पोलिसांनादेखील लागू आहे. तसेच जे पोलिस सरकारी गणवेशात म्हणजे वर्दीत फिरत असतील, त्यांनीदेखील हे नियम पाळले पाहिजे अन्यथा त्यांच्याकडून दुप्पट चालान वसूल केले जाणार आहे. (Police also get double fine for not wearing a helmet)

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पोलिसांसाठीदेखील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हेल्मेटशिवाय वाहन चालविल्यास पोलिसांना दुप्पट चालान भरावे लागेल. हेल्मेटशी संबंधित जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये ज्या ठिकाणी वाहनांचे चालान जारी केले जाते, तिथून जर एखादा पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी हेल्मेटशिवाय दुचाकीवरून गेला आणि त्याच्याकडून चालान वसूल केले नाही तर अशा वेळी सामान्य व्यक्तीला त्याची फसवणूक झाली असे वाटू लागते. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी हेल्मेट न वापरणा-या पोलिसांवरही कारवाई केली जावी, असे निर्देश दिले आहेत.

बाईकच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनेदेखील हेल्मेट घातले पाहिजे. पोलिसांकडून सामान्य नागरिकांच्या तुलनेत दुप्पट चालान वसूल केले जाईल, असेही म्हटले. नवीन नियमांनुसार तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला २,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. या चालानमध्ये हेल्मेटची क्वालिटी, ते ठिक परिधान करणे या गोष्टींचादेखील समावेश करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार तुम्ही हेल्मेटची स्ट्रिप बांधली नसेल तर तुमच्याकडून १,००० रुपयांचा दंड वसूल केला जाईल. हे चालान कलम १९४ ड अंतर्गत कापले जाईल. तुमचे हेल्मेट बीआयएस सर्टिफिकेशनवाले नसेल किंवा डिफेक्टिव्ह असेल तरीदेखील तुमच्याकडून १,००० रुपयांचा दंड वसूल केला जाईल.

​बीआयएस सर्टिफिकेशन म्हणजे काय? -
बीआयएस म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. बीआयएसने जानेवारी २०१९ मध्ये हेल्मेटशी संबंधित नियम जारी केले होते. हेल्मेटचा दर्जा सुधारण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले होते. या नव्या नियमामुळे हेल्मेट बनवणा-या कंपन्यांना बीआयएसने जारी केलेल्या मानकांनुसार हेल्मेट तयार करावे लागते. या नियमानुसार हेल्मेटचे वजन १.२ किलो इतके असले पाहिजे. परिवहन मंत्रालयाच्या निमयामुसार आयएसआय मानक नसलेले हेल्मेट विकणं गुन्हा आहे.

​लहान मुलांनाही हेल्मेटसक्ती -
तुम्ही जर लहान मुलांना दुचाकीवरून फिरवत असाल तर त्यांनीदेखील हेल्मेट घातलेले असले पाहिजे. वाहतुकीच्या नवीन नियमांनुसार दुचाकीवरून फिरणा-या मुलांसाठी हेल्मेटसह हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक आहे. यासोबतच वाहनाचा वेग ताशी ४० किमी इतका असला पाहिजे. या नियमाचे पालन न केल्यास १,००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो आणि ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.

​ऑनलाईन चालान भरा -
तुम्ही चालान ऑनलाईन तपासू शकता आणि दंड भरू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे चेक ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर
तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी चेक चालन स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या वाहनासबंधीची माहिती मागितली जाईल. ही माहिती भरा आणि त्याखाली असलेला कॅप्चा देखील भरा. त्यानंतर गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा, असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom