नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. समाजवादी पार्टीने भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया हेडवर गुन्हा दाखल केला आहे. (case registered against social media head of bjp)
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलचे संचालक मनीष जगन अग्रवाल यांच्या अटकेनंतर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आज सपाच्या वतीने भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया इंचार्ज ऋचा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी लखनऊच्या हजरतगंज ठाण्यात तक्रार दिली. ज्यात त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया इंचार्ज डॉ. ऋचा राजपूत यांच्यावर डिंपल यादवांच्या ट्विटर अकाऊंटवर अभद्र टिपण्णी केल्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
लखनौच्या हजरतगंज पोलिसांनी मनीष जगन अग्रवाल यांनी रविवारी सकाळी अटक केली होती. समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या अभद्र टिपण्णीवरुन हजरतगंज कोतवालीमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. सांगितलं जात आहे की, मनीष जगन अग्रवाल हेच सपाचं ट्विटर हँडल सांभाळत होते आणि तेच सीतापूरचे रहिवाशी आहेत.
No comments:
Post a Comment