Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अडीच हजार वर्षानंतर बुद्धांच्या अस्थींचे नाशिककरांना दर्शन


नाशिक - 'बुद्धम् सरणम् गच्छामी, धम्मम शरणम् गच्छामी, संघम शरणम् गच्छामि'ने नाशिकचे वातावरण मंगलमय झाले. अडीच हजार वर्षांनंतर थायलंड येथून भारतात आलेल्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन नाशिककर कृतकृत्य झाले. 'धन्य जाहले जीवन' अशी भावना तमाम नाशिककरांनी व्यक्त केली,
 
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील परभणी येथील बौद्ध धम्म पदयात्रा फिरत आहे.  ही पदयात्रा नाशिक शहरात दाखल झाल्याने महाकारुणी तथागतांच्या अस्थींचे दर्शन मिळावे अशी उपासकांची इच्छा पूर्ण झाली. बुद्धांच्या अस्थी कलशाचे मंगला आगमनाने सोबत थायलंडच्या भिक्खू संघाचे पदयात्रा नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी रांगा पाहायला मिळाल्या. बुद्ध स्मारकात दर्शनासाठी जनसागर उसळला आणि हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लिन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ भारतीयांना झाला.

थायलंड येथून निघालेला अस्थीकलश रथ आणि भंतेजींची पदयात्रा भारतातील विविध राज्यांत भ्रमण करत महाराष्ट्रात दाखल झाले असून सोमवारी यात्रेचे नाशिकमध्ये आगमन झाले. थायलंड येथील 110 बौद्ध भिक्खू, भारतातील भिक्खू आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन 17 जानेवारीला परभणी येथून निघालेली ही असती कलश धम्मयात्रा नाशकात दाखल झाली. नाशिक शहरातील वडाळा गाव इंदिरानगर ते बुद्ध लेणी दरम्यान संपूर्ण रस्त्यावर रांगोळीसह फुलांचा वर्षाव करत नाशिककरांकडून जागोजागी धम्म पदयात्रेचे धम्म उपासकांनी अभूतपूर्व स्वागत केले.

'बुद्धम् सरणम् गच्छामी, धम्मम शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामिच्या घोषाने वातावरण मंगलमय झाले. उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत सकाळपासून अस्थीकलश आणि पदयात्रेचे दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह मुंबई येथील भंते विनयबोधी, भंते लामाजी भंते शांतीरत्न, भंते बोदानंद समवेत नाशिकचे भंते सुगत सहभागी झाले होते. अस्थिकलश पदयात्रेच्या मार्गावर शहर वाहतूक शाखा व समतात सैनिक ग्लाकडून नियंत्रण ठेवण्यात आले होते. नाशिक शहरातील माडसांगवी मिरची चौक ते समता नगर टाकळी, विजय ममता सिग्नल, रविशंकर मार्ग, वडाळागाव, इंदिरानगर ते बुद्ध लेणी दरम्यान ठिकठिकाणी खीर, फळांचे धम्मदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom