रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्या अभावी ठप्प - आदित्य ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्या अभावी ठप्प - आदित्य ठाकरे

Share This

मुंबई - मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडले आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले. या सर्वांमुळे रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार आहे, असा थेट आरोप ट्वीटच्या माध्यमातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ३१ मेपूर्वी  रस्ते आणि पुलांची कामे पूर्ण होणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत, हे अतिशय धक्कादायक आहे, असा आरोप करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. असे ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता ३१ मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत आहेत, असेही आदित्य़ ठाकरे यांनी टीका केली आहे. नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाईनबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages