महिलेची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2023

महिलेची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल


बार्शी - वाढदिवसादिवशी मोबाइलवर काढलेले फॅमिली फोटो क्रॉप करून त्यातील महिलेचा फोटो स्टेटसवर ठेवून माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे, डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR against one for defaming a woman)

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैयाज खाजा शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित महिला जानेवारी २०२३ मध्ये ओळखीच्या व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी गेल्यानंतर एकाने मोबाइलवर फॅमिली फोटो काढला होता. त्यानंतर १६ एप्रिल २०२३ रोजी त्यातील फोटो क्रॉप करून त्यात फक्त पीडित महिलेचा व त्याचा स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवून त्याखाली बदनामीकारक मजकूर लिहून तो व्हायरल केला.

तसेच पीडित महिलेच्या मुलीसोबत त्याने स्वतःचा फोटो ठेवून ‘मेरी बेटी’ असा मजकूर लिहून मजकूर लिहला. हा प्रकार पाहिल्यानंतर पीडित महिलेने पतीला सांगितले. यानंतर पतीने माझ्या पत्नीची अशी बदनामी का करतोस, असे विचारताच त्याने तिचे व माझे लॉजवरील फोटो माझ्याकडे आहेत. हा ट्रेलर असून तिची बदनामी कशी करतो ते बघ, तुझी मुलगी नसून ती माझीच आहे. मुलीचा डी.एन.ए. चेक करून बघ, असा व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज पाठविल्याने या महिलेने पोलिसात तक्रार दिली.बदनामीकारक मैसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याने पीडित महिलेने तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad