Crime News महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2023

Crime News महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद


मुंबई - ट्वीटरवर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात पंतनगर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पंतनगर पोलिसांनी रामचंद्र आंब्रडकर ट्वीटर अकाऊंट वापरकर्त्याविरोधात माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ‘सीपी मुंबई पोलीस’ या ट्वीटर अकाऊंटवर संदेश पाठवला होता. त्यात महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान केले होते. महिला पोलीस हवालदाराने या संदर्भात पोलीस तक्रार केली होती. या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच या संदेशात पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी खोडसाळपणे समाज माध्यमांवर पोलिसांबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad