शरद पवार यांची अध्यक्षपदावरून निवृत्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2023

शरद पवार यांची अध्यक्षपदावरून निवृत्ती


मुंबई - शरद पवार यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र "लोक माझे सांगाती"च्या  सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत असतानाच राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवारांनी निवृत्त होण्याचा  निर्णय जाहीर  केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. (Sharad Pawar, Ncp)

मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल असे पवार म्हणाले. 

सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गान्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार असे पवार यांनी म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages