मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'ई' विभागातील 'हिंदू वैंकुठधाम' येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी ही तांत्रिक आणि दुरूस्तीच्या कामामुळे येत्या १० मे पर्यंत बंद राहील. या ठिकाणची विद्युत दाहिनी तांत्रिक दुरूस्तीच्या कारणामुळे बंद राहणार आहे.
सदर कामासाठी साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या स्मशानभूमीतील 'विद्युत दाहिनी' बंद ठेवण्याचा निर्णय 'ई' विभागाकडून घेण्यात आला आहे. या ठिकाणी असणारी पारंपरिक पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता नजीकच्या चंदनवाडी, वरळी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा पर्याय या कालावधीत उपलब्ध असेल, असेही 'ई' विभाग कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment