Sukanya Samriddhi Yojana - सुकन्या समृद्धी योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2023

Sukanya Samriddhi Yojana - सुकन्या समृद्धी योजना


पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची काळजी असते तशीच काळजी मुलांच्या लग्नाची सुद्धा असते कारण लग्नांमध्ये मोठ्याप्रमाणात खर्च होतो, गरीब पालकांना त्यांच्या मुलांचे पालनपोषण त्यांच्या कमकुवत आर्थिक परस्थितीमुळे योग्यरीतीने करता येत नाही तसेच त्यांना त्यांच्या मुला मुलींचे पालनपोषण करतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी तसेच तिला तिच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नंतर मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे, या संपूर्ण उद्देशाने केंद्र शासनाने सन 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना 2022 या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे.  (Sarkari Yojana, Government Schemes)

देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करणे त्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश या योजनांच्या माध्यमातून शासनाला साध्य करण्याचा असतो. मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबीपणे जीवन जगता यावे तसेच मुलींचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनांमध्ये अनेक बचत योजना आहे ज्या नागरिकांना आयकर सूट आणि उच्च व्याजदर प्रदान करतात, जेणेकरून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नागरिकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. 

सुकन्या समृद्धी योजना (SSY) हि एक लघु बचत योजना आहे, जी केंद्र सरकारने देशातील मुलींच्या भविष्याच्या सुरक्षितेसाठी बेटी बचाओ बेटी पाढाओ या अभियाना अंतर्गत सुरु करण्यात आली होती, या योजनेंतर्गत मुलींचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक मुलींच्या नावाने हे बचत खाते उघडू शकतात, आणि योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलीच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक रकमी धनराशीची गुंतवणूक करू शकतो. या योजनेच्या अंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी मुलींची वयोमर्यादा 10 वर्षापेक्षा जास्त नसावी, हे बचत खाते नागरिक देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा निर्धारित राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडू शकतात. योजनेंतर्गत सुरवातीला 1000/- रुपये जमा करणे आवश्यक होते परंतु नंतर शासनाने या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढावी या दृष्टीकोनातून या बचत योजनेची गुंतवणुकीची मर्यादा कमी करून वार्षिक 250/- रुपये प्रतिवर्ष इतकी करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 250/- रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे, नागरिक या योजनेमध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि योग्यतेनुसार गुंतवणूक करू शकतात. हि गुंतवणूक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते, या योजनेच्या माध्यमातून सरकारव्दारे गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज देण्यात येते. याच्याशिवाय गुंतवणुकीवर या योजनेच्या माध्यमातून आयकरामध्ये सूट सुद्धा देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम मुलींच्या पालकांना पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँके मध्ये खाते उघडावे लागेल.

योजनेबद्दल अधिक माहिती -
सुकन्या समृद्धी योजना 2023 अंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडल्याच्या तारखेपासून या बचत खात्याची वैधता 21 वर्षा पर्यंत आहे, त्यानंतर ज्या मुलीच्या नावाने बचत खाते आहे तिला योजना परिपक्व झाल्यावर धनराशी दिल्या जाईल.

या योजनेच्या अंतर्गत मुदतीनंतर म्हणजे मुलगी 21 वर्षाची पूर्ण झाल्यावर बचत खाते बंद न केल्यास वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे, बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या नियमाप्रमाणे वर्तमानातील व्याजदराप्रमाणे शिल्लक रकमेवर व्याज जमा होत राहील.

SSY योजनेंतर्गत जर लाभार्थी मुलीचे वयाच्या 21 वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न झाले तर सुकन्या समृद्धी  बचत खाते आपोआप बंद होईल. सुकन्या समृद्धी योजना बचत खात्याची वैधता 21 वर्ष असली तरी, या बचत खात्यात 14 वर्षासाठी धनराशी जमा केल्या जाते, आणि त्यानंतर जमा असलेल्या धनराशीवर व्याज मिळत राहते.

SSY अंतर्गत या बचत खात्यावरील किमान आवश्यक निर्धारित रक्कम 1000/- रुपयांवरून 250/- करण्यात आली आहे, मुलीच्या पालकाने हि किमान आवश्यक निर्धारित रक्कम बचत खात्यामध्ये भरणे आवश्यक आहे, अन्यथा बचत खाते सक्रीय मानले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये वार्षिक 50 दंड भरून सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सुरु केले जाऊ शकते, परंतु किमान आवश्यक निर्धारित रक्कम सुद्धा भरावी लागेल.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातेधारक मुलगी 21 वर्ष वयाची पूर्ण होण्याआधी म्हणजे योजनेचा मॅच्युरीटी कालावधी पूर्ण होण्याआधी बचत खात्यातून रक्कम काढू शकते, परंतु मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एकूण जमा रकमेपैकी 50 टक्केच रक्कम काढू शकेल. तसेच हि काढलेली रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणसाठी किंवा तिच्या लग्नासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

मुलगी 18 वर्षे वयाची पूर्ण झाल्यावर रक्कम काढते वेळी हे निश्चित करणे अनिवार्य आहे कि बचत खात्यामध्ये कमीत कमी 14 वर्षाची बचत ठेव जमा असेल.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत पालक किंवा कायदेशीर संरक्षक एका मुलीच्या नावाने एकाच बचत खाते उघडू शकतात, तसेच दोन मुली असल्यास केवळ दोन मुलींच्या नावाने वेगवेगळे बचत खाते उघडल्या जाऊ शकतात. परंतु जर एक मुलगी असतांना दुसऱ्या वेळेस जुळ्या मुलींचा जन्म झाला तर अशा परिस्थितीत तिन्ही मुलींच्या नावाने बचत खाते उघडल्या जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या योजनेंतर्गत आयकर सूट दिल्या जाते, योजनेंतर्गत बचत खात्यात जमा करण्यात येणारी रक्कम आणि मॅच्युरीटी नंतरच्या धनराशीला आयकर अधिनियम 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad