Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात


मुंबई - या वर्षी पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्‍याबाबतचे अनुमान वर्तवण्‍यात आलेले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार दिनांक १ जुलै २०२३ पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त ९९ हजार १६४ दशलक्ष लिटर म्हणजे ६.८५ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १ जुलै २०२३ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व मुंबईकरांना विनम्र आवाहन करण्यात येते की, पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom