Mumbai Rain - मुंबईत झाड पडून दोघांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2023

Mumbai Rain - मुंबईत झाड पडून दोघांचा मृत्यू


मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. मालाड व गोरेगाव येथे झाड पडल्याने दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पाहणी केली. नागरिकांनी घरात राहावे आणि गरज असेल तरच घराभावर पडावे असे आवाहन आयुक्तांनी केली आहे. (Two dead after falling tree in Mumbai)

झाड पडून दोघांचा मृत्यू -
मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ आहे. येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळं बुधवारी पहाटे कौशल दोषी वय 33 यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोरेगाव पश्चिम येथे जुन्या पालिका कॉलनी जवळ झाड एका घरावर कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. प्रेमलाल निर्मल असे मृताचे नाव असून तो ३० वर्षाचा आहे. 

सखल भागात पाणी साचले - 
मुंबईत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नेहमी प्रमाणे अंधेरी सबवे येथे पाणी साचले. दहिसर पूर्व स्टेशन रोड परिसरात आणि दहिसर पोलीस स्टेशनचे समोर मुख्य रस्त्यावर पाणी साचले. दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली सखल भाग असल्यामुळं पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली. पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी गोदरेज कंपनी ते छेडानगर जंक्शन, चेंबूर फ्लायोव्हर ते सुमननगर फ्लयोव्हरपर्यंत तसेच अंधेरी पश्चिमेत एस.वी. रोडवर पाणी भरल्यामुळे अंधेरी पश्चिमेत वाहतूक कोंडी निर्माण झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad