पुणे - प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एका माजी नगरसेवकावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख अधिक तपास करत आहेत.
गणेश बाळासाहेब ढोरे फुरसुंगी भागातील माजी नगरसेवक आहेत. ढोरे यांनी प्रभागात केलेल्या कामांबाबत एका पत्रकाराने तक्रार केली होती. त्यामुळे ढोरे यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगून तक्रारदारांना मारहाण केली. दोघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार माजी नगरसेवक गणेश बाळासाहेब ढोरे (वय ३५, रा. फुरसुंगी रस्ता, भेकराईनगर) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सागर पोट्रे (वय २६, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव ढमाले (वय २६, रा. भेकराईनगर) यांच्या विरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment