Mumbai crime News - मालाडमध्ये सव्‍वाकोटींची वीज चोरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2023

Mumbai crime News - मालाडमध्ये सव्‍वाकोटींची वीज चोरी


मुंबई - अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईच्‍या दक्षता पथकाने मालाड येथे १.३३ कोटी रुपयांच्या वीजचोरीचा छडा लावला. मालाड पूर्व येथील कुरार गावात इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय करणारे व्यावसायिक थ्री-फेज थेट वीज पुरवठा वापरल्याप्रकरणी दोषी आढळले. याबाबत कांदिवली पोलिस ठाण्यात चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षता पथकाला या परिसरात गेल्या काही महिन्यांत संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. त्‍यामुळे‍ वीजजाळ्याची तपासणी केल्यावर विजेची थेट पुरवठा जोडणी आढळून आली. इलेक्ट्रोप्लेटिंग व्यवसायासाठी थ्री-फेज थेट वीज पुरवठ्याचा बेकायदा वापर उघड झाला. येथे तीन वर्षे आणि नऊ महिन्यांच्या कालावधीत सहा लाख ८८ हजार २३९ युनिटची चोरी झाली. त्याचे मूल्य एक कोटी ३३ लाख पाच हजार २०९ रुपये आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad