प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2023

प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न


मुंबई - मुंबईच्या धारावी परिसरात प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरुणी ६० ते ७० टक्के भाजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिच्या लिव्ह-इन-पार्टनरने केला आहे. यात तरुणी गंभीररीत्या भाजली असून तिला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण धारावी हादरून गेली आहे. या प्रकरणी ४१ वर्षीय आरोपी नंदकिशोर पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad