Buddhist youth killed - नांदेडमध्ये बौद्ध तरुणाची हत्या... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2023

Buddhist youth killed - नांदेडमध्ये बौद्ध तरुणाची हत्या...


नांदेड - जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. गावात भीमजयंती साजरी केल्याने गावातील मराठा तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे. (Buddhist youth killed in Nanded)

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात ॲट्रोसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असून ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर दोन आरोपींचा शोध सुरु आहे. सदर हत्येनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे अक्षयच्या हत्येनंतर समाज माध्यमांवर तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

नेमकी घटना काय ? - 
बोंढार हवेली येथे गुरुवारी (१ जून) विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्या निमित्त गावात वरात काढण्यात आली होती. वरातीत काही युवक डीजे लावून नाचत होते. त्यावेळी गावातील अक्षय भालेराव हा युवक तिथे आला. यावेळी वरातीत नाचण्यावरुन अक्षय भालेराव आणि नाचणाऱ्या युवकांचा काही कारणावरून वाद होता. या वादानंतर वरातीतील युवकांनी अचानक अक्षयवर हल्ला चढवला. अक्षयच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले. यावेळी दोन गटात दगडफेक देखील झाली. काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेने बोंढार हवेली गावात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

दरम्यान, घटनेनंतर मयताच्या भावाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. गावात भीम जयंती मिरवणूक काढल्याच्या रागातून आरोपींनी अक्षयला जीवे मारल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. अक्षयची हत्या केल्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा त्याच्या आई आणि भावाकडे वळवला. अक्षयच्या भावाच्या खांद्यावर देखील आरोपींनी वार केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. ही तक्रार मयत अक्षयचा भाऊ आकाश श्रावण भालेराव याने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad