Mumbai News - पालिकेने २४ तासांत ३१९ पैकी सोडविल्या १७९ तक्रारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2023

Mumbai News - पालिकेने २४ तासांत ३१९ पैकी सोडविल्या १७९ तक्रारी


मुंबई - नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी बुधवारी दिनांक ७ जून २०२३ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'ची सुविधा 8169681697 या क्रमांकावर देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या हेल्पलाईनवर एकूण ३१९ तक्रारी नोंदविल्या. त्यातील कचरा आणि डेब्रिजशी संबंधित असलेल्या २५७ तक्रारी हाताळण्यात आल्या असून त्यातील १७९ तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या आहेत. तसेच गुरुवारी दुपारनंतर आलेल्या ७८ तक्रारीही लवकरच सोडविण्यात येतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आलीय. 

बृहन्मुंबई महानगरपालिककडून मुंबईकरांना आवाहन करण्यात येते की, या हेल्पलाईनवर केवळ कचरा आणि डेब्रिजच्याच तक्रारींची नोंद घेतली जात आहे आणि त्याच तक्रारी सोडविण्यात येत आहेत. नागरिकांनी खासगी मालमत्ताशी संबंधित तक्रारी करू नयेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही हेल्पलाईनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला जात आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. ही यंत्रणा मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 

मुंबईकरांना महानगरपालिकेचे आवाहन - 
'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'वर केवळ घनकचरा व डेब्रीज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाईनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ऍप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची / संभाषणाची सुविधादेखली नाही. बुधवार ७ जूनपासून गुरुवार ८ जून रात्री उशिरापर्यंत एकूण ३१९ तक्रारी आल्या आहेत. परंतु त्यातील ५७ तक्रारी या कचरा आणि डेब्रिजशी संबंधित नाहीत. उर्वरित २५७ तक्रारीपैंकी १७९ तक्रारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ सोडविले आहेत तसेच ७८ ठिकाणच्या तक्रारींवरही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पथक काम करीत आहे. या ७८ ठिकाणी कचरा जास्त असल्याने या तक्रारी देखील लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.

घनकचरा व डेब्रीज वगळता इतर तक्रारी या ५७ आहेत. त्यातील काही तक्रारी या खासगी मालमत्तांच्या आवारातील कचराबाबतच्या आहेत. अशा तक्रारी या हेल्पलाईनवर करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'वर घनकचरा व डेब्रीजच्या १७९ तक्रारी लगेचच सोडविण्यात आल्या आहेत. गुरुवार दुपारनंतर आलेल्या तक्रारीही तात्काळ सोडविण्यात येतील, अशी माहिती चंदा जाधव यांनी दिली. तसेच गुरुवारी दुपारनंतर आलेल्या तक्रारींची नोंद घेण्यात आली असून, त्यादेखील सोडविण्यात येत आहेत.

तक्रार करण्याआधी ही काळजी घ्या - 
हेल्पलाईनवर तक्रार करण्याआधी मुंबईकरांनी काही बाबींकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारींचा आकडा वाढला आहे. वास्तविक या हेल्पलाईनवर तक्रार करताना किव्हा कचऱ्याचे वा डेब्रिजचे छायाचित्रे काढताना मोबाईलचे लोकेशन सुरू असणे गरजेचे आहे. काही नागरिकांनी छायाचित्र काढताना लोकेशन बंद ठेवले होते आणि घरी अथवा अन्य ठिकाणी केल्यावर लोकेशन ऑन करून सदर कचऱ्याचा फोटो हेल्पलाईनवर अपलोड केला. त्यामुळे सदर तक्रारींचा तपशील कळू शकत नाही.

३५० कनिष्ठ अवेक्षक कार्यरत -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार बुधवार, ७ जूनपासून 8169681697 या व्हाटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येत आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदविल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जात आहे. या प्रणालीसाठी महापालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओरशिअर) यांची नेमणूक केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad