Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

Bakari Eid - बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाणार 


मुंबई - आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहल, जमाते उलेमाचे राज्याचे अध्यक्ष नदीम सिद्दीकी, विविध जिल्ह्यातून आलेले मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण सर्व सण उत्सव नेहमीच सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन साजरे करतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी त्याचप्रमाणे ईद मध्येही आपला गृह विभाग नियोजन करत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरवर्षीप्रमाणेच गृह विभाग या सणासाठी नियोजन करतील. आवश्यक ती दक्षता घेतील. या सणापूर्वी तीन-चार दिवस आधी पशूंची वाहतूक सुरु होते. त्यामध्ये काही अनधिकृत घटक अडथळा आणत असतील तर त्याबाबत पोलीस दक्षता घेतील. यापुर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष दिले जाईल.

यावेळी मुस्लिम बांधवाच्या वतीने सिद्दीकी यांनी यंदा ईद व एकादशी एकाच दिवशी आल्याचे सांगून. मुस्लिम बांधवांनी अशा प्रकारे एकाच दिवशी आलेल्या अनेक सणांच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केल्याचे सांगितले. आमदार आझमी, आमदार शेख यांनी बाजार समित्यांबाहेर बकरी विक्रीस परवानगी दिल्याबद्दल व पशूवैद्यकीय तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom