Maharashtra Rain - राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2023

Maharashtra Rain - राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे


मुंबई - यंदाच्या हंगामातील मान्सून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोव्यानंतर आता कोकणात दाखल झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळं कोकण तसेच मुंबईच्या किनाऱ्यावरही पाऊस झाला. अशात पुढील २४ तासांत मराठवाडा, मुंबई, कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. यामुळे कोकणासह मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. यानंतर आता पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर वातावरणही ढगाळ असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad