अनैसर्गिक अत्याचार करून तरुणाला लुटले, रिक्षा चालकाचा शोध सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनैसर्गिक अत्याचार करून तरुणाला लुटले, रिक्षा चालकाचा शोध सुरू

Share This


मुंबई - रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाने 31 वर्षीय तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करून रोख रक्कम, मोबाईल लुटल्याची घटना घाटकोपर पश्चिम भागात मंगळवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Robbed the youth with unnatural torture)

मंगळवारी पीडित तरुणाचा रिक्षाच्या भाड्यावरून एल.बी.एस रोड येथे रिक्षा चालकाशी वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालकाने त्याला डोक्यात सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन तक्रारदार यांच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम व एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, जबरी चोरी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages