हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळित

Share This

मुंबई - पनवेलहून सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याने हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. सकाळीच कामावर जाताना रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने याचा फटका प्रवाशांना बसला आहे. (Fire on rilway track leading to CST)

जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट सारखा प्रकार घडला आहे, आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. त्यामुळे हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, ओव्हर हेड वायर तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages