Mumbai News मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2023

Mumbai News मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड


मुंबई - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने पक्षात फेरबदल सुरू केले असून, काँग्रेसचे मुंबई विभागीय (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या जागी प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत पत्रक काढून घोषणा केली. (Varsha Gaikwad Mumbai Congress President)

आगामी वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणूका (Bmc Elections) तोंडावर आहेत. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका होतील. कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईच्या नेतृत्वात बदल केला आहे. वर्षा गायकवाड या लढाऊ कार्यकर्त्या आहेत. महिला, दलित समाजात असणारा पाठिंबा, राज्य सरकारमध्ये विविध मंत्रीपदावर केलेले काम. मुंबईतील सर्वसामान्य,गोरगरिब लोकांच्या झोपडया-वस्त्यांमध्ये फिरून काम करण्याची आवड या वर्षा गायकवाड यांच्या जमेच्या बाजू आहेत.

वर्षा गायकवाड या सुशिक्षित आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी हा त्यांचा मतदारसंघ आहे. राज्यातील मंत्रीमंडळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केलेले आहे. दलित समाजात त्यांना स्थान आहे. मंत्रीपदावर असतानाही गोरगरिबांच्या झोपडयांत-वस्त्यांमध्ये फिरून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्या करायच्या. मुंबईत काँग्रेसला जनाधार मिळवून देणे. आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत समन्वय राखणे आणि काँग्रेस पक्षाच्या जागा वाढविण्याचे मोठे काम वर्षा गायकवाड यांना आगामी काळात करावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad