भाजपा फेरीवाल्यांच्या पाठीशी - अ‍ॅड. आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2023

भाजपा फेरीवाल्यांच्या पाठीशी - अ‍ॅड. आशिष शेलार


मुंबई - मुंबईतील फेरीवाल्यांचे जगण्याचे, रोजीरोटीचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका घेत अधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या कायमच्या सोडवू असे आश्वासन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिले. 

मुंबई भाजपा हॉकर्स युनिटच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजप हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी, अमरजीत मिश्रा यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले, फेरीवाल्यांच्या परिश्रमाची समस्यांची जाणीव आहे. ऊन, पाऊस, वारा याचा विचार न करता फेरीवाले बांधव व्यवसाय करतात. मुंबईतील गुन्हेगारी थांबली पाहिजे यासाठी कायदा व्यवस्थेला फेरीवाले मदत करतात. फेरीवाले 'खरे मुंबईकर' आहेत. आम्ही अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू कधीच घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या धोरणानुसार फेरीवाल्याना त्यांचे संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत असेही ते म्हणाले. या आधीच फेरीवाला धोरण अंमलबजावणी अपेक्षित होती. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. महविकास आघाडी काळात व्हेडिंग कमिटीच्या निवडणुका झाल्या नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या असत्या तर आज ही स्थिती उद्भवली नसती. फेरीवाल्या बांधवांसाठी कायदेशीर लढाईसाठी वकील म्हणून मी स्वतः उभा राहणार असल्याची ग्वाही शेलार यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad