राजस्थान / बाडमेर - राजस्थानच्या बाडमेर येथे एका महिलेने तिच्या चार मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ वर्षीय महिलेने आपल्या चार मुलांना ड्रममध्ये बंद केले, यादरम्यान श्वास कोंडून मुलांचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने देखील आत्महत्या केली.
पोलिस आधिकारी कमलेश गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार बाडमेरजवळील बनियावास सदर महिला आपल्या पती आणि मुलांच्या सोबत राहत होती. शनिवारी रात्री महिलेने गळफास घेत आत्महत्या करण्याआधी महिलेने आपल्या तीन मुली आणि एका मुलास स्टीलच्या ड्रममध्ये बंद केले होते. ज्यामुळे मुलांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. या घटनेच्या दिवशी मृत महिलेचा पती घरात नव्हता. तो मजूर असून घटनेच्या वेळी तो कामावर गेला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले.
No comments:
Post a Comment