Mumbai Crime - 7 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2023

Mumbai Crime - 7 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक


मुंबई - कांदिवली पूर्व परिसरात 7 वर्षांच्या मुलीशी गेल्या वर्षभरापासून असभ्य वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कांदिवली पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी हा मुलीचे वास्तव्य असलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक आहे.

याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने केलेल्या अत्याचाराच्या संदर्भात कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरली होती.

पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीमध्ये काम करणारा 45 वर्षीय सुरक्षा रक्षक गेल्या एक ते दीड वर्षांपासून पीडित मुलीला असभ्यरित्या स्पर्श करत होता. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल गेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad