मुंबई - मुंबई महापालिकेवर २५ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर पालिकेने तोडक कारवाई केली. हे कार्यालय बेकायदेशीर असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. या कारवाई दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून विरोध केल्याने काही वेळ येथे तणाव निर्माण झाला होता.
वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोकळ्या जागेवर ठाकरे गटाकडून अनधिकृत कार्यालय बांधण्यात आलं होतं. तसंच काही होर्डिंग्जही लावण्यात आले होते. हे बांधकाम करताना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सोबतच बीएमसीला विचारणा देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळेच अनधिकृत बांधकाम पाडत असल्याचं मुंबई महापालिकेकडून पदाधिकारी आणि माध्यमांना सांगण्यात आलं. महापालिकेकडे या कार्यालयाची अधिकृत कागदपत्रे नव्हती, नोंद नव्हती असं बीएमसीकडून सांगण्यात आलेय.
"महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर आहे. काल बांधलेलं नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, पण एकाएकी तोडफोड? हे वैरभावनेचे द्योतक आहे," "हे कार्यालय जवळपास 40-50 वर्ष जुनं आहे. एकीकडे आपण झोपड्यांना अधिकृत करत आहोत. मात्र वांद्रे पश्चिमेकडील झोपड्यांना हात लावण्याची हिंमत नसलेलं हे सरकार आहे. त्यांचं एलआयसीसमोरचे कार्यालय सुद्धा अनधिकृत आहे. हे कार्यालय वांद्रे पूर्वमधील शाखेपेक्षा नवीन आहे. ते तोडण्याची हिंमत असेल तर तिथेही कारवाई करा. भाजपचं कार्यालय आधुनिक, वातानुकूलित कार्यालय आहे. आमची कार्यलये झोपड्यांसारखी आहेत. गोरगरिबांना सेवा देणारी कार्यालयं आहेत," असं अरविंद सावंत म्हणाले.
No comments:
Post a Comment