Health News - झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Health News - झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते

Share This

मुंबई - प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीला २४ तासांमध्ये किमान सात-आठ तास विश्रांती घेणे आवश्यक असते. रात्री शांतपणे झोप घेतल्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते. निरोगी राहण्यासाठी निद्राचक्र पूर्ण होणे आवश्यक असते.  पण तुम्हाला माहित आहे का झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. इतकंच नव्हे तर तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार डाव्या कुशीवर झोपल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

डाव्या कुशीवर झोपल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे ऍसिड रिफ्लेक्स व हृदयाजवळ छातीत जळजळ होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. स्वादुपिंडाच्या आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे मदत करू शकते. ज्यांना सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो त्यांना कालांतराने तोंडाने श्वास घेण्याची सवय लागते. सतत घोरण्यामागे हे सुद्धा एक कारण ठरू शकते. डाव्या बाजूच्या कुशीवर झोपल्याने नाकपुड्या मोकळ्या होण्यास मदत होऊ शकते परिणामी नाकाने श्वास घेणे सहज होऊन घोरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. छातीत जळजळ कमी होऊ शकते. आपले हृदयही किंचित डाव्या बाजूला असल्याने अशाप्रकारे झोपल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होऊ शकते परिणामी हृदयाच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. शरीरातील सर्व अवयवांसह रक्तप्रवाह व त्यासह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. यामुळे वेळेआधीच अवयव थकण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. मेंदूसाठी सुद्धा ही स्थिती फायदेशीर ठरू शकते. सहसा गरोदर महिलांना सुद्धा डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. या पद्धतीने झोपल्यास गर्भात बाळ आरामदायी स्थितीत राहू शकते व त्यावर दबाव पडत नाही. तसेच गरोदरपणात पायाला येणारी सूज सुद्धा कमी होऊ शकते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages