Mumbai News - मॉलमधील गेम झोनमध्ये खेळताना तरुणाचा पाय मोडला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2023

Mumbai News - मॉलमधील गेम झोनमध्ये खेळताना तरुणाचा पाय मोडला


मुंबई - मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेम झोनमध्ये बाऊन्स जम्पिंग गेम खेळताना एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बाउन्स गेमसाठी उडी मारली तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा (Trampoline park) स्प्रिंग तुटला आणि तरुण पडला. खेळताना पडल्यामुळे त्याचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. तीर्थ कांजी बेरा असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तीर्थ कांजी बेरा हा 19 वर्षाचा आहे आणि तो विद्यार्थी असून घाटकोपर येथे राहतो. 18 जून रोजी तो आपल्या मित्रांसह मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. गेम झोनमध्ये जाण्यापूर्वी त्याने तिकीट काढले आणि बाउन्स गेमसाठी उडी मारली तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तो तरुण पडला. त्यानंतर या तरुणाच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्या तरुणाला कुर्ल्यातील क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असलेल्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. सध्या तीर्थला उपचारासाठी कुर्ल्यातील क्रिटी केअर एशिया, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बांगूर नगर पोलिसांनी गेम झोनच्या (Game Zone) व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad