Monsoon - पुढच्या 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2023

Monsoon - पुढच्या 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार


मुंबई - मान्सून मुंबईच्या (Mumbai) वेशीवर दाखल झाला आहे. पुढील 48 तासात मान्सून (Monsoon) मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं हवामान विभाग मुबईत कधी मान्सून दाखल झाल्याची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण पुढच्या 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. सोबतच मध्य महाराष्ट्रातील काही भागासह मराठवाड्यातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे.

मुंबईत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री चांगला पाऊस झालयानंतर सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होणार आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad