६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2023

६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार


ठाणे - ठाण्यातील माजिवाडा परिसरात यशस्वी नगर येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी कसोशीने तपास करून मूळचा पश्चिम बंगालचा असलेल्या आणि पेशाने मिस्त्री असलेल्या आरोपीला मुंबईच्या माहीम येथून अटक केली आहे.

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकलीवर एका ४५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पीडित चिमुकली सायंकाळी ४.३० च्या सुमारास रडताना काही नागरिकांना दिसली. तिचा रक्तस्राव होत असल्याचे आढळल्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हा घृणास्पद प्रकार उघड झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी मुंबईच्या माहीम येथून चुरका शरन (छोरने) उर्फ दादू (४५) याला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad