वेब सिरीज पाहून बापाच्या हत्येचा कट रचला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2023

वेब सिरीज पाहून बापाच्या हत्येचा कट रचला


पुणे - मुलीच्या प्रेमाला विरोध आणि आईचा होणारा सततचा जाच याला कंटाळून मुलगी, बायको, आणि मुलीच्या प्रियकराने बापाचा काटा काढला आहे. झोपेत डोक्यात वरवंटा मारून त्यानंतर मानेवर चाकूने वार करत बापाचा खून केला.

जॉन्सन कॅजीटन लोबो वय ४९ हे गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी येथे राहत होते. जॉन्सन यांच्या १७ वर्षीय मुलीचे अ‍ॅग्नेल कसबे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तसेच, जॉन्सन हा पत्नीसोबतही सतत वाद घालायचा. जॉन्सनचा अ‍ॅग्नेल आणि मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यातून त्यांचा अनेकदा वाद होता होता. त्यामुळे तिघांनी मिळून जॉन्सन याचा काटा काढण्याच कट रचला. ३० मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात जॉन्सनच्या डोक्यात वरंवटा मारून मानेवर चाकूने वार केले. त्यामध्ये जॉन्सन यांचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी (३१ मे) रात्रीपर्यंत त्यांनी मृतदेह तसाच घरात ठेवला. त्यानंतर अंधार झाल्यानंतर जॉन्सन यांचा मृतदेह चारचाकी गाडीत घालून पुणे-नगर रस्त्यावरील सणसवाडी जवळील एका पेट्रोल पंपाच्या अलीकडे नाल्यात टाकून पेट्रोल ओतून पेटवून दिला. पण, घरातून मृतदेह बाहेर काढता तो सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.

पोलिसांनी २३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं, त्यानंतर एक संशयास्पद वॅगनआर गाडी शोध घेत ती गाडी वडगावशेरी येथील असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी अ‍ॅग्नेल कसबे याचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी अ‍ॅग्नेल कसबे याची कसून चौकशी केली त्यानंतर त्याने पोलिसांना अशा प्रकारे खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३), मुलीचा प्रियकर अ‍ॅग्नेल जॉय कसबे (वय २३ रा. साईकृपा सोसायटी वडगावशेरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad