Crime News - अंधेरी, कुर्ल्यात स्फोट घडवण्याची धमकी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Crime News - अंधेरी, कुर्ल्यात स्फोट घडवण्याची धमकी

Share This

मुंबई - महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai News) आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune News) बॉम्बनं उडवण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली. तसेच, अंधेरी, कुर्ला भागात उद्या (24 जून 2023) संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे.  मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या धमकीच्या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरनं काल सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला आणि 24 जून रोजी संध्याकाळी 6 : 30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं. आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉलरनं केला आहे. पोलीस तपासादरम्यान कॉलरनं हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages