प्रवाशांनी भरलेल्या बसचा टायर फुटला,12 जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2023

प्रवाशांनी भरलेल्या बसचा टायर फुटला,12 जण जखमी


मुंबई / संभाजीनगर - पुण्यावरून (Pune) छत्रपती संभाजीनगर कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर खाजगी लक्झरीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये १० ते ३५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर टायर फुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ही महामार्गाच्या कडेला असणाऱ्या पाच फूट उंच भिंतीवरती जाऊन नालीत आदळली. या लक्झरीमध्ये 35 ते 35 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर यातील दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad