महापुरुषांशी संबंधित १३ शाळांचा कायापालट होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2023

महापुरुषांशी संबंधित १३ शाळांचा कायापालट होणार


मुंबई - राज्यातील १३ ऐतिहासिक गावांमधील १३ शाळांचा कायापालट होणार आहे. वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. महापुरुषांशी संबंधित १३ शाळांच्या विकासासाठी तब्बल १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

या योजनेत अहमदनगरच्या चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेचा समावेश असणार आहे. यासोबतच अमरावतीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा शाळा, अमरावती येथील शिक्षणमहर्षि कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख शाळेचाही कायापालट होणार.

यासोबतच कोल्हापूर येथील राजर्षि शाहू महाराज आणि नाशिकमधील कुसुमाग्रजांची शाळा, पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा विकास सरकार करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरीतील महर्षि धोंडो केशव कर्वे व साने गुरुजी शाळा, सांगलीतील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व क्रांतिसिंह नाना पाटील शाळांचा चेहरामोहरा देखील बदलणार आहे. तसेच साता-यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले शाळांसाठी देखील सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad