ब्रेन इटिंग अमीबाचा भारतात आणखी एक बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ब्रेन इटिंग अमीबाचा भारतात आणखी एक बळी

Share This

कोच्ची - अत्यंत दुर्मिळ अशा ब्रेन इटिंग अमीबाने भारतात आणखी एक बळी घेतला आहे. या अमिबामुळे केरळमधील एका १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य अधिका-यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे.

अलप्पुळा जिल्ह्यातील पनावल्ली गावात हा मुलगा राहत होता. अंघोळ करत असताना नाकावाटे हा अमिबा या मुलाच्या शरीरात गेला. यानंतर या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी २०१६ साली अलाप्पुळाच्या तिरुमला वॉर्डमध्ये प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिसचा (पीएएम) पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२० साली मलप्पुरम जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले होते. २०२० मध्येच कोळिकोड आणि २०२२ साली थ्रिसूर जिल्ह्यात एक रुग्ण आढळला होता. या सर्व रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचंही जॉर्ज यांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे -
या अमिबाची लागण झाल्यास डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसतात. अशा प्रकारचा आजार होणे हे दुर्मिळ असले, तरी याचा मृत्यूदर ९७ ते १०० टक्के आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता, खबरदारी घेण्याचा इशारा केरळच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

या रोगाचा प्रतिबंध कसा करावा?
प्रायमरी अमिबीक मेनिंगोएन्सेफलायटिसवर फार कमी उपचार आहेत, जर संसर्ग झाल्यावर लगेच याची माहिती मिळाली तरच या रोगावर उपचार होऊ शकतात. या संसर्गाशी लढण्यासाठी अँटीफंगल औषधांची शिफारस केली जाते. तर, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा आहे. या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डबक्यातील अथवा दूषित पाण्यात डुबक्या मारणे, पोहणे टाळण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जाते. पाण्याच्या क्रियाकल्पांमध्ये भाग घेताना, नाकाचे क्लिप वापरणे किंवा आपले डोके पाण्याच्या वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

दूषित पाण्यामध्ये आढळतो अमिबा
हा अमिबा दूषित पाण्यामध्ये आढळतो असे आरोग्य अधिका-यांनी सांगितले. यासोबतच आरोग्य विभागाने लोकांना दूषित पाण्यात अंघोळ करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात यापूर्वी देखील अशी पाच प्रकरणे समोर आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages