लोणावळा - लोणावळा व खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे. सध्या हे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे धरणावर पर्यटकांची आता गर्दी होण्याची शक्यता आहे.
धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्या पाण्यात बसून वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येत असतात. धरणाच्या सांडव्याला लागून पायर्या असून या पायर्यांवरुन धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वहात असते. लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले की खर्या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात होते. अनेक देश विदेशातील पर्यटक धरणाच्या पायर्यांवर बसण्याचा व या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
No comments:
Post a Comment