Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

समृद्धी महामार्गावर खासगी बसला आग, २६ प्रवाशांचा मृत्यू


मुंबई - बुलढाणा सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात समृद्धी महामार्गावर नागपूरकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी बसला आग लागली. या आगीत तब्बल 26 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. (Private bus caught fire on Samriddhi highway, 26 passengers died)

आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 2.00 वाजताचे सुमारास सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून मुंबईच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात होऊन आग लागली. प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये 29 प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते. पैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले असून 26 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस, आरोग्य, महसूल सह इतर शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच प्रवाशांची नावे मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे कळविण्यात आले आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून मदत - 
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या  झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom